अश्विनच्या स्पिन बॉलिंगसमोर किवींची टॉप ऑर्डर कोसळली

टेस्टवर टीम इंडियानं आपली पकड मजबूत केली आहे. टेस्टच्या तिसऱ्या दिवसच्या पहिल्या सेशनवर किवींनी वर्चस्व गाजवल्यानंतर सेकंड सेशनमध्ये टीम इंडियानं दमदार पुनरागमन केलं. 

Updated: Oct 10, 2016, 02:16 PM IST
अश्विनच्या स्पिन बॉलिंगसमोर किवींची टॉप ऑर्डर कोसळली title=

इंदूर : टेस्टवर टीम इंडियानं आपली पकड मजबूत केली आहे. टेस्टच्या तिसऱ्या दिवसच्या पहिल्या सेशनवर किवींनी वर्चस्व गाजवल्यानंतर सेकंड सेशनमध्ये टीम इंडियानं दमदार पुनरागमन केलं. 

आर. अश्विनच्या स्पिन बॉलिंगसमोर किवींची टॉप ऑर्डर कोसळली. मार्टिन लँथम आणि मार्टिन गप्टिल ही ओपनिंग जोडी धोकादायक वाटत असताना अश्विननं लँथमनला 53 रन्सवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
 त्यानंतर किवींची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोशली. त्यांचे पाच बॅट्समन 148 रन्सवर आऊट झाले. 

आता त्यांची टीम फॉलोऑनच्या छायेत आहे. टीम इंडियानं इंदूर टेस्टवर पुर्णँपणे वर्चस्व मिळवलंय. आता किवींना फॉलोऑन देत टीम इंडिया तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 3-0 नं निर्भेळ यश मिळवण्यास आतूर असेल.