सिंधूचे लक्ष्य आता हाँगकाँग ओपन

चीन ओपन जेतेपद मिळवत आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिजी जेतेपदावर कब्जा करणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे लक्ष्य आता आजपासून सुरु होत असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेवर आहे. 

Updated: Nov 23, 2016, 08:13 AM IST
सिंधूचे लक्ष्य आता हाँगकाँग ओपन title=

नवी दिल्ली : चीन ओपन जेतेपद मिळवत आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिजी जेतेपदावर कब्जा करणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे लक्ष्य आता आजपासून सुरु होत असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेवर आहे. 

सिंधूने फुझाऊमध्ये झालेल्या चीन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवले. यामुळे हाँगकाँग ओपन स्पर्धेतही याच कामगिरीच अपेक्षा सिंधूकडून असेल. 

या स्पर्धेतील सिंधूचा पहिला सामना इंडोनेशियाच्या लिंडावेनी फानेत्रीच्या विरुद्ध असेल. तर गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेली सायना नेहवालचा पहिला सामना थायलंडच्या पार्नटिप बुरानाप्रासेरत्सुक हिच्याशी होईल.