सिंधू बनलीये सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू

बॅडमिंटनच्या दुनियेत 'सिंधू'उदय केव्हाच झालाय. मात्र, आता भारतीय बॅडमिंटनची ओळख असणारी सिंधू ब्रँड नंबर वनच्या दिनेशनं वाटचाल करतेय. सिंधू सर्वाधिक कमाई करणारी भारतीय महिला अॅथलिट बनलीय. 

Updated: Apr 7, 2017, 09:57 AM IST
सिंधू बनलीये सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू title=

नवी दिल्ली : बॅडमिंटनच्या दुनियेत 'सिंधू'उदय केव्हाच झालाय. मात्र, आता भारतीय बॅडमिंटनची ओळख असणारी सिंधू ब्रँड नंबर वनच्या दिनेशनं वाटचाल करतेय. सिंधू सर्वाधिक कमाई करणारी भारतीय महिला अॅथलिट बनलीय. 

बॅडमिंटन कोर्टवरील चीनी ड्रॅगनची सद्दी मोडित काढत सिंधूनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. आपल्या असमान्य कामगिरीनं यशाची एकेक शिखरं ती पादाक्रांत करतेय. आता वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंगमध्ये तिनं ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट स्पॅनिश गर्ल कॅरोलिना मरिनला मागे टाकत दुस-या क्रमांकावर झेप घेतलीय. 

बॅडमिंटन कोर्टवर सिंधूनं आपल्या खेळानं सा-यांनाच दखल घ्यायला भाग पाडलीय. त्याचप्रमाणे ब्रँडच्या दुनियेतही सिंधूला अव्वल स्थान खुणावतंय. सर्वाधिक कमाई करणा-या भारतीय अॅथलिट्समध्ये सिंधूचा भारतीय क्रिकेट कॅप्टन  विराट कोहलीनंतर दुसरा क्रमांक लागतोय. तिनं महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकलंय. त्याचप्रमाणे टेनिस क्वीन सानिया मिर्झाला ब्रँडच्या दुनियेत ती कडवी झुंज देतेय. तिनं सानियावर कुरघोडी करत सर्वाधिक कमाई करणा-या भारतीय महिला अॅथलिट्समध्ये नंबर वन स्थान काबीज केलंय. 

रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकल्यानंतर सिंधू एका रात्रीत सुपरस्टार झाली. आणि आतातर जाहिरातदारांचीही ती पहिली पसंती ठरतेय.  सध्याच्या घडीला सिंधूचं भारताची नंबर महिला अॅथलिट आहे यात काही शंकाच नाही. बॅडमिंटन कोर्टवर सिंधू अधिराज्य तर गाजवतेय आणि आता ब्रँडच्या दुनियेचीही ती क्वीन ठरलीय.