मुंबई : अनेकांना घड्याळचा खूप छंद असतो. वेगवेगळ्या प्रकारची ब्रॅन्डेट घडयाळं ही अनेकांना घालायला आवडतात मग यामध्ये क्रिकेटर ही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक खेळाडूंना घड्याळ घालून खेळतांना पाहिलं असेल. पण त्यांची किंमत ऐवढी आहे की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
पाहा किती आहे क्रिकेट खेळाडूंच्या घड्याळांची किंमत.
1. विराट कोहली : विराट कोहली Panerai Luminor 1950 GMT 3 Days Automatic Acciaio घड्याळ घालतो. विराट जेव्हा कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट विथ कपिल शो मध्ये आला होता तेव्हा त्याच्या हातात हे घड्याळ दिसलं होतं याची किंमत आहे ६ लाख २९ हजार रुपये. हे घड्याळ ४४ एमएमचं आहे.
2. उमेश यादव : भारतीय टीमचा फास्ट बॉलर उमेश यादव Graham Silverstone Stowe GMT घड्याळ वापरतो. याची किंमत ६ लाख ७३ हजार रुपये आहे.
3. महेंद्र सिंह धोनी : भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी Audemars Piguet Royal Oak Offshore Bumble Bee घड्याळ वापरतो. या घड्याळाची किंमत २६ लाख ७८ हजार रुपये आहे.
4. डेविड वॉर्नर: ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेविड वॉर्नर Hublot Black Magic 44mm घड्याळ वापरतो. वॉर्नरच्या या घड्याळाची किंमत आहे १० लाख ८७ हजार रुपये आहे.
5. सचिन तेंदुलकर : भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंदुलकर या सगळ्या खेळांडुच्या बाबतीत खूपच पुढे आहे पण तो घड्याळांच्या बाबतीत ही सगळ्यांच्या पुढे आहे. सचिन Audemars Piguet Carbon Concept Tourbillon या कंपनीचं घड्याळ वापरतो. याची किंमत तब्बल १.३ कोटी आहे.