चेंडू डोक्यावर आदळल्याने अंपायर गंभीर जखमी

वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडू डोक्यावर आदळल्याने झालेल्या दुर्घटनेत अंपायर पॉल रिफेल यांना गंभीर दुखापत झालीये.

Updated: Dec 8, 2016, 02:37 PM IST
चेंडू डोक्यावर आदळल्याने अंपायर गंभीर जखमी title=

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडू डोक्यावर आदळल्याने झालेल्या दुर्घटनेत अंपायर पॉल रिफेल यांना गंभीर दुखापत झालीये.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 49व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जेनिंग्सने स्क्वेअर लेगला फटका मारला. यावेळी भुवनेश्वर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करत होता. त्याने तो चेंडू थ्रो केला आणि तो थेट रिफेल यांच्या डोक्यावर आदळला. 

चेंडू डोक्यावर आदळल्याने ते जागीच कोसळले. काही वेळात ते मैदानात उठून बसले मात्र गंभीर दुखापत असल्याने त्यांना तातडीने मैदान सोडावे लागले. रिफेल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिफेल यांच्या जागी मारीस हे अंपायरिंग करत आहे.