पाकिस्तानच्या टीम विरोधात पाकिस्तानात लागले 'शर्म करो'चे नारे

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतकडून पराभव झाल्य़ानंतर आणि वर्ल्डकपमधून बाहेर झाल्य़ानंतर पाकिस्तानची टीम मायदेशी परतली. मायदेशी परतल्यानंतर ही पाकिस्तान टीमला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

Updated: Mar 27, 2016, 10:19 PM IST
पाकिस्तानच्या टीम विरोधात पाकिस्तानात लागले  'शर्म करो'चे नारे title=

कराची : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतकडून पराभव झाल्य़ानंतर आणि वर्ल्डकपमधून बाहेर झाल्य़ानंतर पाकिस्तानची टीम मायदेशी परतली. मायदेशी परतल्यानंतर ही पाकिस्तान टीमला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

लाहोर येथे पाकिस्तान टीम पोहोचल्यानंतर शर्म करा, शर्म करोचे नारे दिले गेले. इंतिखाब आलम, मोहम्मद हफीज, मोहम्मद इरफान, उमर अकमल, वहाब रियाज, अहमद शहजाद हे जेव्हा लाहोर विमानतळावर पोहोचले तेव्हा समर्थकांकडून घोषणा देण्यात आल्या.

आशिया कप आणि त्यानंतर वर्ल्डकपमध्ये भारतकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तान टीमची पाकिस्तानात मोठी आलोचना करण्यात आली. विमानतळावर पोहोचल्यानंतर खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यात आली.