सिंधूला चायना ओपनचे जेतेपद

 भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने चायना ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावलेय. सिंधूने चीनच्या आठव्या मानांकित सून यू हिचा 21-11, 17-21 आणि 21-11 असा पराभव करत तिने जेतेपदाला गवसणी घातलीये.

Updated: Nov 20, 2016, 01:57 PM IST
सिंधूला चायना ओपनचे जेतेपद title=

बीजिंग :  भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने चायना ओपन सुपर सीरिज चे जेतेपद पटकावलेय. सिंधूने चीनच्या आठव्या मानांकित सून यू हिचा 21-11, 17-21 आणि 21-11 असा पराभव करत तिने जेतेपदाला गवसणी घातलीये.

पहिल्या गेममध्ये सिंधूने सून यूला जिंकण्याची कोणतीही संधी दिली नाही. तिने हा गेम 21-11 असा आरामात जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये सून यूने जोरदार कमबॅक केले आणि दुसरा गेम 21-17 ने जिंकला. 

तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधू आणि सून यू यांच्यात सुरुवातीला काँटे की टक्कर पाहायला मिळाली मात्र 10 पॉईंट्स मिळवल्यानंतर सिंधूने सातत्याने कामगिरी वाढवताना मोठी आघाडी घेतली आणि तिसरा गेम जिंकला. 

सिंधूचे सुपर सीरिज स्पर्धेतील हे पहिलेच जेतेपद आहे. तसेच हे जेतेपद पटकावणारी तिसरी बिगर चीनी खेळाडू ठरलीये. ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल जिंकल्यानंतर सिंधूनं चायना ओपन जिंकत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय.