मेलबर्न : २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये आयसीसी दहाच टीमचा समावेश करण्याच्या विचारात आहे. त्याबद्दल असोसिएट देशांना नाराजी व्यक्त केली आहे. मात्र वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय होण्यासाठी चांगल्या संधी आहेत, अशी माहिती आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवास यांनी दिली आहे.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये १४ एवजी दहाच टीम खेळवण्याच्या निर्णयावर सर्व स्थरातून टीका होत आहे. भारतरत्न सचिन तेंडूलकरसह अनेकांनी आयसीसीच्या या निर्णयावर हरकत घेतली आहे.
याविषयी बोलतांना सचिन तेंडूलकर बोलला की, क्रिकेटला विश्वस्तरीय खेळ बनवण्याच्या प्रयत्नांना हा मोठा झटका आहे.
श्रीनिवासन यांनी सांगितले की, पुढच्या वर्ल्ड कपसाठी मुख्य आठ टीम क्वालिफाय करतील आणि नवव्या आणि दहाव्या जागेसाठी असोसिएट टीमध्ये स्पर्धा होणार आहे.
आयसीसीच्या क्वालिफायींग नियमानुसार वर्ल्डकपमध्ये यजमान इंग्लंडसह क्रमवारीतील अव्वल आठ टीमची स्थानं सुरक्षित असणार आहेत. क्वालिफायर्समध्ये असोसिएट देशांना अव्वल आठ टीम व्यतिरिक्त इतर टीमसोबत खेळावं लागणार आहे. यामुळे असही होऊ शकतं की एकही असोसिएट देश वर्ल्ड कपमध्ये आपलं स्थान निश्चित करू शकणार नाही.