केवीन पीटरसनच्या अटकेचे फोटो ट्वीटरवर

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केवीन पीटरसननं त्याचा एक फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. त्यात त्याला पोलिसांनी अटक केल्याचं दिसून येत आहे.

Updated: Mar 29, 2015, 03:15 PM IST
केवीन पीटरसनच्या अटकेचे फोटो ट्वीटरवर title=

मुंबई : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केवीन पीटरसननं त्याचा एक फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. त्यात त्याला पोलिसांनी अटक केल्याचं दिसून येत आहे.

केवीन पीटरसन सध्या वर्ल्डकप निमित्त ऑस्ट्रेलियात आहे. पीटरसनला मित्रांसोबत नाईट आउट महागात पडल्याचं फोटोमधून दिसून येत आहे. ट्वीटरवरील त्या फोटोला नीट पाहिल्यास काही गोष्टी स्पष्ट होतात. पीटरसननं आपल्या अटकेचे फोटो टाकून, प्रेक्षकांची मस्करी करत असल्याचं दिसून येत आहे. कारण पीटरसनच्या मागे अॅडम गिलक्रिस्ट फोटोत हसतांना दिसतोय.

 

इंग्लड टीमची वर्ल्डकपमधील निराशाजनक कामगिरी पाहता पीटरसन पुन्हा इंग्लंडच्या संघात पुमरागमन करण्याची शक्यता आहे. पीटरसननं 2013-14ला अॅशेस मालिकेदरम्यान क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. तेव्हा तो 34 वर्षांचा होता. मात्र इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाचे भावी अध्यक्ष कोलिन ग्रेव्सनी केवीनच्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.