वेस्टइंडिजला हरवत न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक

न्यूझीलंड वेस्टइंडिजसमोर विजयासाठी तगडे आव्हान उभे केले होते. मार्टिन गुप्टीलने तडाखेबाज बॅटींग करताना नाबाद २३७ रन्स ठोकल्यात. न्यूझीलंडने ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले. ते टार्गेट वेस्टइंडिज संघ पेलू शकला नाही. ३०.०३ ओव्हरमध्ये संघ ऑलऑऊट झाला.

Updated: Mar 21, 2015, 01:31 PM IST
वेस्टइंडिजला हरवत न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक title=

वेलिंग्टन : न्यूझीलंड वेस्टइंडिजसमोर विजयासाठी तगडे आव्हान उभे केले होते. मार्टिन गुप्टीलने तडाखेबाज बॅटींग करताना नाबाद २३७ रन्स ठोकल्यात. न्यूझीलंडने ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले. ते टार्गेट वेस्टइंडिज संघ पेलू शकला नाही. ३०.०३ ओव्हरमध्ये संघ ऑलऑऊट झाला.

वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलने जोरदार बॅटींग केली. त्यांने ६१ रन्सची खेळी केली. त्याने ८ उत्तुंग सिंक्स आणि दोन फोर मारलेत. गेलची विकेट गेल्यानंतर वेस्टइंडिज संघ पराभवाच्या छायेत गेला. त्यानंतर धडाधड विकेट गेल्या. एका बाजुने किल्ला लढविणाऱ्या गेल क्लिन बोल्ड मिल्ने काढला. मात्र, वेस्टइंडिजने रनरेट चांगले ठेवले होते. विकेट टिकवून ठेवता न आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

मार्टिन गुप्टिलचे नाबाद द्विशतक आणि ट्रेंट बोल्टच्या बॉलिंगच्या जोरावर न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये धडक मारली. वेस्ट इंडीजवर १४३ रन्सनी सहज विजय मिळविला. आता त्यांची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २५ मार्चला ऑकलंड येथे होणार आहे.

वर्ल्डकपमध्ये गुप्टिलने झळकाविलेले हे दुसरे द्विशतक आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमधील सहावे द्विशतक आहे.  न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने चार बळी मिळविले. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅकलम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मॅकलम आणि मार्टिन गुप्टिल यांनी डावाची सुरुवात जोरदार केली. 

आतापर्यंत विश्वकरंडकात फटकेबाजी करत असलेल्या मॅकलमने या सामन्यातही आक्रमक फलंदाजीस सुरवात केली. पण, पाचव्या षटकात टेलरच्या गोलंदाजीवर उंच फटका मारून तो १२ रन्स बाद झाला. या १२ रन्समध्ये त्याने १ चौकार व १ षटकार खेचला. त्यानंतर आलेल्या केन विल्यम्सनने गुप्टिलला चांगली साथ दिली. या दोघांनी धावगती राखत अर्धशतकी (६२ रन्स) भागीदारी केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.