मार्टिन गुप्टीलचे तडाखेबाज विक्रमी द्विशतक

तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये आजचा दिवस गाजवला तो न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टीलने. त्याने नाबाद दमदार द्विशतक तडकावले. त्यांने १६३ बॉलमध्ये २४ फोर आणि ११ उत्तुंग सिक्स मारत नाबाद २३७ रन्स केल्यात. न्यूझीलंड मार्टिनच्या खेळीवर धावांचा डोंगर उभा केला. वेस्टइंडिजला ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले.

Updated: Mar 21, 2015, 11:58 AM IST
मार्टिन गुप्टीलचे तडाखेबाज विक्रमी द्विशतक title=

वेलिंग्टन : तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये आजचा दिवस गाजवला तो न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टीलने. त्याने नाबाद दमदार द्विशतक तडकावले. त्यांने १६३ बॉलमध्ये २४ फोर आणि ११ उत्तुंग सिक्स मारत नाबाद २३७ रन्स केल्यात. न्यूझीलंड मार्टिनच्या खेळीवर धावांचा डोंगर उभा केला. वेस्टइंडिज समोर ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले.

एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याचा पहिला मान न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिन गुप्टील याने मिळवला आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने द्विशतक झळकावले असून या विश्वचषकात असा विक्रम करणारा वेस्टइंडिजच्या ख्रिस गेलपाठोपाठ तो दुसरा फलंदाज ठरला आहे. गुप्टीलने १५२ बॉलमध्ये २०० रन्स केल्या आहेत.

वेलिंग्टनवर सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याचा नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार मॅक्युलमने सुरूवातीच्या षटकांत जोरदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. मात्र, त्याला अपयश आले. मात्र, याची कसून मार्टिनने भरुन काढली. त्याने चौफेर फटकेबाजी केली. तोच आजच्या दिवसाचा खरा हिरो ठरला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.