जोकोविचच अमेरिकन ओपनचा विजेता

अटीतटीच्या सामन्यात जोकोविचने महत्वाच्या क्षणी फेडररला हरवलं. जोकोविचने फेडररवर 6-4, 5-7, 6-4, 6-4 अशी मात केली. या मोसमातलं जोकोविचचं हे तिसर ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

Updated: Sep 14, 2015, 09:38 AM IST
जोकोविचच अमेरिकन ओपनचा विजेता title=

न्यूयॉर्क : अटीतटीच्या सामन्यात जोकोविचने महत्वाच्या क्षणी फेडररला हरवलं. जोकोविचने फेडररवर 6-4, 5-7, 6-4, 6-4 अशी मात केली. या मोसमातलं जोकोविचचं हे तिसर ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात जोकोविचने बाजी मारत विजेतेपद पटकावलं आहे. 
 
दुसरा सेट फेडररने जिंकून जोकोविचला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र जोकोविचच्या दमदार खेळापुढे त्याला काहीही करता आलं नाही.

जोकोविचचं पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात पहिल्या सेट पासून वर्चस्व दिसत होतं.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.