भारताला संधी, न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा पराभव

वर्ल्डकप टी-20 मध्ये आज पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगला. भारतासोबत झालेल्या पराभवानतंर विश्वचषकात आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला विजय मिळवणं गरजेचं होतं पण या सामन्यातही पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 22, 2016, 11:08 PM IST
भारताला संधी, न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा पराभव title=

मोहाली : वर्ल्डकप टी-20 मध्ये आज पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगला. भारतासोबत झालेल्या पराभवानतंर विश्वचषकात आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला विजय मिळवणं गरजेचं होतं पण या सामन्यातही पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला.

न्यूझीलंड संघ हा मजबूत स्थितीत आहे. किवींनी पाकिस्तानसमोर १८१ धावांचे आव्हान ठेवले आहे. गुप्टीलच्या धडाकेबाज ८० रन्सच्या जोरावर न्यूझीलंडने ५ विकेट गमवत १८० रन्स केले. पाकिस्तानकडून मोहम्मद शम्मी आणि कर्णधार आफ्रिदीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानने चांगली सुरुवात केली पण विजय मिळवता आला नाही. पाकिस्तानकडून शर्जील खानने सर्वाधिक २५ बॉलमध्ये ४७ रन्स केले इतर कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही.

भारताला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी आणखी ४ गुणांची गरज आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतासमोरील एक अडथळा दूर झाला आहे. आता भारताला उद्या होणाऱ्या बांग्लादेश आणि नंतर ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागेल त्यानंतर भारताचं सेमिफायनलचं तिकीट पक्क होईल.