घरच्या मैदानात मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादला ४ विकेटनं हरवलं

आयपीएलच्या दहाव्या मोसमात घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय झाला आहे.

Updated: Apr 12, 2017, 11:57 PM IST
घरच्या मैदानात मुंबईचा सलग दुसरा विजय, हैदराबादला ४ विकेटनं हरवलं title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय झाला आहे. सनरायजर्स हैदराबादचा मुंबईनं ४ विकेटनं पराभव केला आहे.

टॉस जिंकून मुंबईनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि हैदराबादला २० ओव्हरमध्ये १५८ रन्सपर्यंतच मजल मारून दिली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं ३ तर हरभजननं दोन विकेट घेतल्या. मलिंगा, मॅकलेनगन आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.

१५९ रन्सचा पाठलाग करताना मुंबईला सुरुवातीलाच जॉस बटलर आणि मग रोहित शर्माच्या रुपात दोन धक्के बसले पण पार्थिव पटेलच्या ३९, नितीश राणाच्या ४५ आणि कृणाल पांड्यानं २० बॉलमध्ये केलेल्या ३७ रन्समुळे मुंबईचा विजय झाला.

हैदराबादविरुद्धच्या या विजयामुळे मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तीनपैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे मुंबईकडे चार पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये २ मॅचमध्ये दोन विजय मिळवणारी किंग्ज इलेव्हन पंजाब पहिल्या क्रमांकावर आहे. तर तीनपैकी दोन मॅच जिंकणारी सनरायजर्स हैदराबाद चार पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.