IPL-10 : मुंबई इंडियन्सला सतावण्यासाठी बांगलादेशचा हा गोलंदाज येतोय...

 बांगलादेशचा तेज गोलंदाज मुस्तफिजूर रहमान इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सीझनमध्ये गतविजेते सनराइजर्स हैदराबाद संघात सामील होणार आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 12, 2017, 07:04 PM IST
IPL-10 : मुंबई इंडियन्सला सतावण्यासाठी बांगलादेशचा हा गोलंदाज येतोय... title=

मुंबई :  बांगलादेशचा तेज गोलंदाज मुस्तफिजूर रहमान इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सीझनमध्ये गतविजेते सनराइजर्स हैदराबाद संघात सामील होणार आहे.

मुंबई आणि हैदराबाद यांच्या बुधवारी वानखेडे स्टेडियममध्ये सामना होणार आहे. 

सनराइजर्सचे कोच टॉम मुडी यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की मुस्तफिजुर रहमान पुढील सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

 

त्यामुळे अंतीम अकरामध्ये त्याला स्थान मिळण्याची शक्यता असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहे. 

मुडी म्हणाले, तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध असेल पण तो कोणाची जागा घेणार याचा निर्णय बुधवारी घेतला जाईल. दरम्यान मुस्तफिजुर याने फेसबूक  पोस्ट टाकून सनरायजर्स संघाला जॉइन करणार असल्याचे पोस्ट केले आहे. भारतासाठी रवाना झालो आहे. मिशन आयपीएल... ऑरेंज आर्मी...