www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएलमध्ये घडलेलं स्पॉट फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुदगल समितीच काम करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुदगल समिती सदस्यांची संख्या वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
मुदगल समितीमध्ये उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मुकूल मुदगल, एल. नागेश्वर राव आणि निलय दत्ता यांचा समावेश आहे. तसेच न्यायायने या चौकशी समितीत जे वरिष्ठ पोलीस अधिकारी बी. बी. मिश्रा यांची निवड केली आहे. मिश्रा यांना स्पॉट फिक्सिंग आणि भ्रष्टाचारासंबंधीत कोणाचीही चौकशी करण्याचा, कागदपत्रे ताब्यात घेण्याचा, तसेच रेकॉर्ड करण्याचा अधिकार हा न्यायालयाने दिलेला आहे. तसेच या प्रकरणाबद्दल बी. बी. मिश्रांना मुंबई, चेन्नई आणि दिल्ली पोलीस मदत करणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, सुनिल गावस्कर आणि शिवलाल यादव हे न्यायालयाची पुढची सुनावणी होईपर्यंत आपल्या पदावर कायम राहतील. बीसीसीआयची आगामी निवडणूक ही सप्टेंबर महिन्यात होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.