मुंबई : क्रिकेटवेड्या भारतीयांची या खेळाविषयी असलेली क्रेझ अख्या जगाला माहीत आहे. म्हणूनच, वर्ल्डकप २०१५ च्या फायनलमॅचसाठी न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्क्युलमनं याच क्रिकेटफॅन्सना साद घातलीय.
भारतातील लोकांचं क्रिकेटवरील प्रेम लक्षात घेऊनच मॅक्क्युलमनं भारतीयांना पत्र लिहून वर्ल्डकपच्या फायनल मॅचसाठी न्यूझीलंडला सपोर्ट करण्याचं आवाहन केलंय.
वर्ल्ड कप २०१५ ची फायनल मॅच रविवारी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात होणार आहे. टीम इंडियाच्या मॅचेसवेळी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटफॅन्सनं मैदानावर लावलेली हजेरी उल्लेखनीय होती. पण, टीम इंडिया मात्र या लढतीतून आता बाहेर पडलीय. त्यामुळे या प्रेक्षकांनी शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला सपोर्ट करावं, असं आवाहनच मॅक्युलमनं केलंय.
न्यूझीलंडसाठी हा खूप महत्त्वाचा सामना आहे. न्यूझीलंड टीम यापूर्वी कधीही वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत पोहचलेली नव्हती. अशा वेळी आपल्याला क्रिकेटफॅन्सच्या सपोर्टची गरज आहे. भारतीय प्रेक्षक न्यूझीलंडला नक्की सपोर्ट करतील, असा विश्वास मॅक्क्युलमला वाटतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.