मुंबई : सचिन तेंडुलकरने जगभरातील जवळ-जवळ सर्वच मैदानांवर शतकं झळकावली आहेत.
मात्र क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर सचिन तेंडुलकरला एकही शतक काढता आलेलं नाही.
भारतातील काही खेळाडूंना लॉर्डसवर शतक करण्याचा बहुमान मिळवता आलेला नाही, पाहा कुणी केलंय लॉर्डसवर शतक आणि कुणी नाही.
लॉर्डसवर शतकी खेळी करणारे टॉप फाईव्ह इंडियन्स
1) दिलीप वेंगसरकर - वेगसरकर यांनी लॉर्डसवर तीन शतकं केली आहेत.
2) वीनू मंकड - वीनू मंकड लॉर्डसवर शतक लावणारे पहिले भारतीय आहेत.
3) सौरव गांगुली - गांगुलीने आपल्या पहिल्याच सामन्यात लॉर्डसवर शतक केलं
4) अजित आगरकर - अजित आगरकरने आपल्या पहिल्याच सामन्यात लॉर्डसवर शतक केलं आणि नाबाद होता (109*)
5) अजिंक्य रहाणे - लॉर्डसवर आपल्या पहिल्याच सामन्यात शतक लगावलं आणि टीम इंडियाची अडचण दूर केली.
लॉर्डसवर एकही शतक न करू शकणारे पाच दिग्गज खेळाडू
1) सुनील गावसकर - गावसकरांच्या नावावर 10 हजार पेक्षा जास्त रन्स आहेत, 34 कसोटी शतकं आहेत, पण लॉर्डस एकही शतक नाही
2) सचिन तेंडुलकर - सचिनने कसोटी सामन्यात 51 शतकं लगावली. पण लॉर्डस एक शतक नाही.
3) व्हीव्हीएस लक्ष्मण - करिअरमध्ये 17 शतक, पण लॉर्डसवर एकही शतक नाही.
4) वीरेंद्र सेहवाग - भारतासाठी दोन तिहेरी शतकांसह 23 शतक लगावली, पण लॉर्डसवर एकही शतक नाही.
5) मोहिंदर अमरनाथ - परदेशी मैदानांवर चांगलं रेकॉर्ड ठेवणाऱ्या मोहिंदर अमरनाथ यांनी 11 कसोटी शतक लगावली, पण लॉर्डसवर नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.