हे काय अनुष्का… आता शून्यावर बोल्ड झाला विराट!

भारत-इंग्लंड टेस्ट मॅच सीरिजमध्ये एकीकडे विराट कोहलीची कमाल दिसत नाहीय तर दुसरीकडे आपली गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मासह विराट सध्या खूप चर्चेत आहे. 

Updated: Jul 20, 2014, 06:12 PM IST
हे काय अनुष्का…  आता शून्यावर बोल्ड झाला विराट! title=

लंडन: भारत-इंग्लंड टेस्ट मॅच सीरिजमध्ये एकीकडे विराट कोहलीची कमाल दिसत नाहीय तर दुसरीकडे आपली गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मासह विराट सध्या खूप चर्चेत आहे. 

काही दिवसांपूर्वी विराट कोहलीकडे टीम इंडियाचा संकटमोचक म्हणून बघितलं जात होतं. पण आता असं वाटतंय की त्याचा फॉर्म कुठं तरी हरवलाय. लॉर्ड्स टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कोहली पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली अतिशय अयशस्वी होतांना दिसतोय. 

इंग्लंडमधील मागील चार इनिंग्जमध्ये विराटनं 1, 8, 25 आणि 0 असे रन्स बनवले. मागील वर्षीच्या तुलनेत त्याचा फॉर्म खूप बिघडलेला दिसतोय. 2013मध्ये त्यानं खेळलेल्या 8 टेस्ट मॅचमध्ये 12 इनिंग्जमध्ये एक वेळा नॉटआऊट राहत त्यानं 616 रन्स बनवले. गेल्यावर्षी त्याच्या बॅटिंगची सरासरी 56 टक्के होती आणि सर्वोत्तम स्कोअर 119. 

मागील काही काळापासून विराट कोहली टीम इंडियाचा कणा राहिलेला आहे. अशात त्याचं अपयश टीम मॅनेजमेंटच्या चिंतेचा विषय बनलाय. कदाचित बीसीसीआयला त्यांचा निर्णय चुकीचा वाटत असेल कारण त्यांनी विराटला इंग्लंड दौऱ्यावर त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माला सोबत नेण्याची परवानगी दिली. विराटचे चाहते हेच म्हणतायेत की, अनुष्कामुळं विराटचं चित्त विचलित झालंय, त्याचा परिणाम खेळावर होतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.