मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात नाबाद शतक ठोकणाऱ्या लोकेश राहुलने दुसऱ्या सामन्यात याआधीचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात राहुलने ३३ रन्स काढून रेकॉर्ड केलाय.
दोन्ही सामन्यात मिळून राहुलने एकूण १३३ रन्स केलेत आणि त्याची सरासरी १३३ आहे. वन-डेमध्ये आउट होण्याआधी असा रेकॉर्ड आजपर्यंत फक्त भारताचा फलंदाज डब्ल्यू वी रमण यांनी केला होता. रमणने आउट होण्याआधी १०३ रन्स काढलेले. मात्र आता हा रेकॉर्ड मोडून राहुलने एक नवा इतिहासच रचला आहे.
राहुलने पहिल्याच मॅचमध्ये शतक ठोकले होते, तर रमणने पहिल्या मॅचमध्ये केवळ ७ रन्सच काढले होते. मात्र दुसऱ्या मॅचमध्ये रमणनी ९५ रन्स काढून उत्तम खेळी साकारलेली होती.