IPL 10 : पंजाबनं मुंबईला ७ रन्सनं पछाडलं

आयपीएल - १० च्या ५१ व्या मॅचमध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबई इंडियन्सला ७ रन्सनं पछाडलं. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 12, 2017, 12:15 AM IST
IPL 10 : पंजाबनं मुंबईला ७ रन्सनं पछाडलं title=

मुंबई : आयपीएल - १० च्या ५१ व्या मॅचमध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबई इंडियन्सला ७ रन्सनं पछाडलं. 

किंग्ज इलेव्हननं दिलेल्या २३१ रन्सचा पाठलाग करत मैदानात उतरलेल्या मुंबईच्या टीमनं २० ओव्हर्समध्ये सहा विकेटसहीत २२३ रन्स बनवले. 

आजच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहीत शर्मानं टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 

मुंबईकडून पोलार्ड आणि हार्दिक पांड्यानं पंजाबकडून मॅट हॅनरीनं फेकलेल्या १६ व्या ओव्हरमध्ये २७ रन्स घेतले. पोलार्ड-पांड्यानं प्रत्येकी दोन-दोन सिक्सर ठोकले.  

याअगोदर....

आयपीएलच्या १० व्या सिझनमध्ये पॉइन्ट्स टेबलमध्ये क्रमांक १ वर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना आज किंग्ज इलेवन पंजाबच्या फलंदाजांनी चांगला चोप दिला. निर्धारित २० षटकात एकूण २३० धावा कुटून मुंबईसमोर धावांचा डोंगर रचला. 

पंजाबकडून वृद्धीमान साहा याने ५५ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने  ९३ धावा कुटल्या. तर त्याला सुरूवातीला गुप्टील आणि नंतर मॅक्सवेल यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे पंजाबने ३ गडींच्या मोबदल्यात २३० धावा काढल्या. 

मुंबईकडून सर्वाधिक धावा या हरभजन सिंग याने दिल्या. त्याने आपल्या ३ षटकात ४५ धावा दिल्यात. त्यानंतर हार्दिक पांड्या याने २ षटकात २९ धावा दिल्यात.