दुबई : केनियामध्ये २०००मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे भारतीय संघात पदार्पण करणारा युवराज सिंग तब्बल ११ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत पुनरागमन करतो आहे.
युवराज सिंग याने २००६ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भाग घेतला होता. त्यानंतर त्याला २००९ आणि २०१३ मध्ये झालेल्या स्पर्धेत निवडण्यात आले नव्हते.
भारताचा अनुभवी फलंदाज युवराज सिंग याला १ ते १८ जून दरम्यान होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला अजिंक्यपद मिळाले होते.
या निवडीबद्दल युवराज सिंग म्हणाला. ५० षटकांचया सामन्यात भारतीय संघात परतल्याने खूप आनंदी आहे. टीमसाठी योगदान करण्यास उत्सुक आहे. खिताब वाचविण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.