रिओ : साताऱ्य़ाची धावपटू ललिता बाबरचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलंय. 3हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात ललिता दहाव्या स्थानी राहिली.
ललितानं प्रथामिक फेरीपेक्षा फायनलला जास्त वेळेची नोंद केली. ललितानं 9मिनिट 22.74 सकेंदांची वेळ नोंदवली. गोल्ड मेडल बहरीनच्या जेबेट रुथनं पटकावलं.
सिल्व्हर मेडल केनियाच्या जेपकेमॉईला तर ब्राँझ मेडलवर अमेरीकेच्या इमा कुबर्ननं नाव कोरलं. ललिताला ऑलिम्पिक मेडल जरी जिंकता आलं नसलं तरी तिनं मोठा संघर्ष करत इथंपर्यंत मजल मारलीय.
गोल्ड मेडल पटकावणा-या जेबेटनं 8मिनिट 59.75 सेकंद सिल्व्हर मेडल पटकावणा-या जेपकेमॉईनं 9 मिनिट 07.12 सेकंद तर ब्राँझ मेडल पटकावणा-या इमानं 9 मिनिट 07. 63 सेकंदांच्या वेळेची नोंद केली.