कोल्हापूरच्या गणेश माळीने जिंकले कॉमनवेल्थमध्ये मेडल

महाराष्ट्राच्या गणेश माळी या मराठी मुलाने 'कॉमनवेल्थ'मध्ये भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिले. कोल्हापूरचा या सुपुत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, आपल्या मुलाचा गौरवास्पद पराक्रम रात्री टीव्हीवर पाहिल्यानंतर नित्यनेमाने मुलाच्या यशानंतरही आई-वडील रोजंदारीवर गेलेत.

Updated: Jul 26, 2014, 07:10 PM IST
कोल्हापूरच्या गणेश माळीने जिंकले कॉमनवेल्थमध्ये मेडल  title=

मुंबई : महाराष्ट्राच्या गणेश माळी या मराठी मुलाने 'कॉमनवेल्थ'मध्ये भारताला ब्राँझ मेडल मिळवून दिले. कोल्हापूरचा या सुपुत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, आपल्या मुलाचा गौरवास्पद पराक्रम रात्री टीव्हीवर पाहिल्यानंतर नित्यनेमाने मुलाच्या यशानंतरही आई-वडील रोजंदारीवर गेलेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे गणेश माळी राहत आहे. तो एका गरीब कुटुंबातील आहे. त्याला चुलत भाऊ रवींद्र माळी याने खेळण्याचे प्रोत्साहन दिले. या संधीचे गणेशने सोने केले आहे.

गणेशचे वडील चंद्रकांत माळी बिल्डिंग पेंटर आहेत. तर आई गृहीणी आहे. ती शेतावर काम करते. मुलाच्या यशानंतर त्यांनी आपल्या कामात खंड पाडला नाही. दुसर्‍याच्या शेतात बांध खुरपणार्‍या आई अनिता यांना मुलाच्या यशाचा मोठा अभिमान वाटत आहे. 

दरम्यान, आपल्या मुलाने केलेला पराक्रम त्यांच्या गावीही नव्हता. गणेश माळीने कांस्यपदक मिळविले. ही बातमी कळताच कुरुंदवाड आणि परिसरात पसरताच गणेशच्या आई-वडिलांचे अभिनंदन करायला नागरिकांनी गर्दी केली. मात्र, चंद्रकांत माळी आजही पेंटिंगसाठी, तर आई मोलमजुरीसाठी बाहेर गेल्या होत्या.

कुरुंदवाड येथे दोन खोल्यांच्या साध्या कौलारू घरात माळी कुटुंब वास्तव्यास आहे. गणेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा असला तरी व्यायामासाठी त्याला सवड देणे आणि त्याच्या खुराकावर पैसा खर्च करण्याइतकी त्यांची श्रीमंती नाही. परंतु मुलाची आवड कायम जपली.  वर्षभरापूर्वी तो हवाईदलामध्ये भरती झाला आणि त्यांच्या पंखांना नवीन बळ मिळाले. गणेशनेही प्रशिक्षकांचा विश्‍वास न तोडता परिश्रम केले आणि त्याचे फळ त्याला कांस्यपदकाच्या रूपाने मिळाले.

२०२०च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून त्याच्या हातून देशाचे नाव मोठे व्हावे, ही त्याच्या आईवडिलांची अपेक्षा आहे, त्यासाठी आणखी कष्ट करावयास ते तयार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.