ग्लास्गो : कॉमनवेल्थमध्ये आज तिसऱ्या दिवशी भारताने सुरुवातीला सिल्वर मेडलची कमाई केली. त्यानंतर दोन गोल्ड आणि दोन सिल्वर मेडल मिळवत भारताने 15 मेडल मिळवताना पदतालिकेत पुन्हा चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत 5 गोल्ड, 7 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.
25 मीटर एअर फिस्टलमध्ये भारताच्या आणि कोल्हापूरची कन्या राही सरनोबत हिने गोल्ड मेडलची कमाई केली. तर याच प्रकारात अनिसा सय्यदने सिल्वर मेडल पटकावून भारतीची शान अधिक उंचावली आहे.
या आधी दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल पटकाविले. आज तिसऱ्या दिवशी १० मीटर एअर रायफलमध्ये आणखी एक सिल्वर मेडल प्रकाश नांजप्पाने यांने मिळवून दिले. तर 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या मुलींना पुन्हा बाजी मारत एक गोल्ड आणि एक सिल्वर मेडल मिळविले. अपूर्वी चंडेलाला गोल्ड मेडल तर अयानिका पॉलला सिल्वर मेडल मिळाले.
ऑलिंपिक आणि विश्वकरंडक दोन्ही स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकाविणारा अभिनव हा एकमेव भारतीय नेमबाज आहे. त्यांने आपली गोल्ड मिळाल्यानंतर जाहीर केली आहे.तर ५३ किलो वजनी गटात संतोषी मात्साने ब्राँझ मेडल पटकावले.
दुसऱ्या दिवशी 16 वर्षीय मलाईका गोयल हिला सिल्वर मेडल मिळाले. दहा मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये मलाईकाने हे पदक मिळविले. जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या हिना सिद्धू पात्रता फेरीत पहिल्या क्रमांकावर असूनही अंतिम फेरीत तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे तिची पदकाची संधी हुकली. पात्रता फेरीमध्ये हिना सिद्धूने 383, तर मलाईका गोयलने 378 गुण मिळविले होते.
56 किलो वेटलिफ्टिंग गटात सुखेन डे यांने भारताला दुसरे गोल्ड मेडल मिळवून दिले. तर याच गटात महाराष्ट्राच्या गणेश माळी यांनी ब्राँझ पदक मिळविले. सुखेनने 248 किलो वजन उचलले तर गणेश यांनी स्नॅच प्रकारात 111 किलो आणि क्लीन अॅंड जर्क प्रकारात 133 किलो वजन उचलले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.