विराट कोहली म्हणाला, कटक तो झाकी है, कोलकता अभी बाकी है...

इंग्लंडला २-०ने पराभूत करत मालिका खिशात टाकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला अजूनही आपल्या कामगिरीवर समाधान नाही आहे. आम्ही आमच्या क्षमतेच्या ७५ टक्केच खेळलो, १०० टक्के हे कोलकत्यात खेळू असे विराट कोहलीने म्हटले आहे. म्हणजे कटक तो झाकी है.. कोलकता अभी बाकी है... 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 19, 2017, 10:20 PM IST
विराट कोहली म्हणाला, कटक तो झाकी है, कोलकता अभी बाकी है... title=

कटक : इंग्लंडला २-०ने पराभूत करत मालिका खिशात टाकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला अजूनही आपल्या कामगिरीवर समाधान नाही आहे. आम्ही आमच्या क्षमतेच्या ७५ टक्केच खेळलो, १०० टक्के हे कोलकत्यात खेळू असे विराट कोहलीने म्हटले आहे. म्हणजे कटक तो झाकी है.. कोलकता अभी बाकी है... 

संघातील सर्वांनी चांगली कामगिरी केली पण अजूनही त्याच्या क्षमतेच्या ७५ टक्केच या मॅचमध्ये दिले असे वाटते. त्यामुळे १०० टक्के पाहायचं असेल तर कोलकत्यात पाहा असे विराटने मॅचनंतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात रवी शास्त्रीशी बोलताना सांगितले. 

विराटने केले अश्विन जडेजाचे कौतुक 

अश्विन आणि जडेजा यांनी या सिझनमध्ये टेस्ट मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचा पुढचा भाग या मॅचमध्ये दाखविला आहे. जडेजाने महत्त्वाच्या क्षणी रॉयची विकेट घेतली आणि अश्विनने आपल्या लौकिकाला साजेल अशी गोलंदाजी करत ३ विकेट घेतल्या. मधल्या काळातील ओव्हर्समध्ये दोघांनी घेतलेल्या विकेटमुळे खूप मदत झाली. नाही तर इंग्लंडला हा स्कोअर खूप छोटा वाटत होता.