मुंबईकर सूर्यकुमारच्या खेळीने केकेआर विजयी

आयपीएलचा पहिला सामना केकेआरने जिंकला आहे. मुंबई इंडिन्सचे १६८ धावांचे आव्हान कोलकाता नाईट रायडरने १८ षटकांत ३ गडी गमावत पूर्ण केले. सुर्यकुमार यादवने या सामन्यात सर्वाधिक म्हणजे ५ षटकार लगावले. तर फिंच आणि रायडु यांना बाद करणाऱ्या मोर्ने मोरकेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलंय.

Updated: Apr 10, 2015, 05:09 PM IST
मुंबईकर सूर्यकुमारच्या खेळीने केकेआर विजयी title=

मुंबई : आयपीएलचा पहिला सामना केकेआरने जिंकला आहे. मुंबई इंडिन्सचे १६८ धावांचे आव्हान कोलकाता नाईट रायडरने १८ षटकांत ३ गडी गमावत पूर्ण केले. सुर्यकुमार यादवने या सामन्यात सर्वाधिक म्हणजे ५ षटकार लगावले. तर फिंच आणि रायडु यांना बाद करणाऱ्या मोर्ने मोरकेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलंय.

१८ षटकांत ३ गडी गमावत केकेआरने १७० धावा केल्या आणि आयपीएलचा पहिल्या सामन्यावर विजयाची मोहोर उमटवली. 

रॉबिन उथप्पा अवघ्या नऊ धावांवर बाद झाल्यानंतर गौतम गंभीरच्या फलंदाजीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.  ७ चौकार व एक षटकार लगावत गौतम गंभीरने ५७ धावा केल्या परंतू,  बुराहच्या गोलंदाजीवर खेळत असताना रायडूकडे झेल गेल्याने त्याला तंबूत परतावे लागले. 

तसेच, मनिष पांडेने २४ चेंडूमध्ये ३ षटकार आणि २ चौकार लगावत ४० धावा केल्या. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर खेळताना पोलार्डकेड झेल गेल्याने पांडे बाद झाल्यावर सुर्यकुमार यादव आणि युसुफ पठाण यांनी तडाखेबंद फलंदाजी करत सामना सहजपणे जिंकला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.