नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकणाऱ्या खेळाडूंना विचित्र शिक्षा देण्याचा विचार केला आहे.
या संदर्भात आलेल्या बातमीनुसार पदक जिंकले नाही म्हणून खेळाडूंना कोळशाच्या खाणीत काम करायला लावले जाऊ शकते. किम जोंगला आपल्या खेळाडूंकडून ५ सुवर्ण पदकसह १७ मेडलची अपेक्षा होती. उत्तर कोरियाला रिओ ऑलिम्पिकमध्ये केवळ ७ पदक मिळाले.
उत्तर कोरियाकडून रिओ ऑलिम्पिकमध्ये ३१ खेळाडू पाठवले होते. त्यात दोन सुवर्ण, ३ रजत आणि २ कास्य पदक जिंकले. अशी पण बातमी आहे की एक फुटबॉल मॅच पराभूत झाल्यावर उत्तर कोरियाच्या खेळाडूंना लाइव्ह टीव्हीवर शिक्षा देण्यात आली.
फायनानश्ल एक्स्प्रेस या वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार अपेक्षा प्रमाणे पदक न जिंकणाऱ्यांना शिक्षा देण्यात येणार तसेच त्याच्या सर्व सुखसुविधा हिसकावून घेतल्या जाणार आहेत. तसेच जिंकणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसं देण्यात येणार आहेत.