भारताच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा जस्टिन लॅंगर

ऑस्ट्रेलियाचा माजी फंलदाज जस्टिन लॅंगरचा देखील भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत समावेश झाला आहे. वर्ल्ड कपनंतर डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर हे प्रशिक्षक पद रिक्त झालं होतं. 

Updated: May 18, 2015, 02:02 PM IST
भारताच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा जस्टिन लॅंगर  title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी फंलदाज जस्टिन लॅंगरचा देखील भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत समावेश झाला आहे. वर्ल्ड कपनंतर डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर हे प्रशिक्षक पद रिक्त झालं होतं. 

याआधी लॅंगर ऑस्ट्रेलियाच्या टीमचे फलंदाज सल्लागार होते. लॅंगरने १०५ कसोटी सामन्यात ७ हजार ६९६ धावा केल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॅंगरचं नाव देखील प्रशिक्षकाच्या शर्यतीत आहे. मात्र याबाबत आता काही सांगणं जरा घाई होईल. बीसीसीआयने कोणलाही प्रस्ताव पाठवलेला नाही. मात्र अॅन्डी फ्लॉवर आणि जस्टिन लॅंगर यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. 

माहितीनुसार, आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर प्रशिक्षक पदाच्या निवडीबाबत बैठक घेतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.