Video : आऊट झाल्यावर झोपी गेला होता मुंबईचा कर्णधार रोहित, पुण्याने असे जागे केले...

 मुंबई वि. पुणे आयपीएलच्या सामन्यात काल मुंबईने एका धावेने बाजी मारली पण या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यावर झोपी गेला होता. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 22, 2017, 07:45 PM IST
 Video : आऊट झाल्यावर झोपी गेला होता मुंबईचा कर्णधार रोहित, पुण्याने असे जागे केले... title=

हैदराबाद :  मुंबई वि. पुणे आयपीएलच्या सामन्यात काल मुंबईने एका धावेने बाजी मारली पण या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यावर झोपी गेला होता. 

कर्णधार रोहित शर्मा विजयाबाबत आश्वस्त होता, त्यामुळे की काय तो आऊट झाल्यावर झोपी गेला.  या सामन्यात रोहितने २४ धावा केल्यानंतर बाद झाला. त्याला झम्पाने बाद केले. त्यानंतर पॅव्हेलियन गेलेला रोहित झोपला होता.  हे कॅमेऱ्यात कैद झाले. 

रोहित झोपला होता हे मुंबई इंडियन्सची आठवी विकेट पडली तेव्हा लक्षात आले. कर्ण शर्मा बाद झाल्यावर पुण्याकडून जल्लोष करण्यात आला. तेव्हा रोहितची झोप मोडली. 

मुंबईने या सामन्यात १२९ धावा केल्या. पण पुण्याला केवळ १२८ धावाच करता आल्या. त्यामुळे १ धावेने पुण्याचा पराभव झाला.