सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या आजी कोण...घ्या जाणून

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर या आजी चांगल्याच चर्चेत आल्यात. यांच्याच प्रार्थनेमुळे मुंबईचा विजय झाल्याचे सोशल नेटकरी म्हणतायत.

Updated: May 22, 2017, 07:34 PM IST
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या आजी कोण...घ्या जाणून title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर या आजी चांगल्याच चर्चेत आल्यात. यांच्याच प्रार्थनेमुळे मुंबईचा विजय झाल्याचे सोशल नेटकरी म्हणतायत.

त्यांच्या नावाने जोक्सही सोशल मीडियावर फिरतायत. मात्र या व्हायरल झालेल्या आजी कोण आहेत तुम्हाला माहीत आहे का? या आजी म्हणजे मुंबई इंडियन्सच्या फॅन आणि नीता अंबानी यांच्या आई पूर्णिमाबेन दलाल आहेत. 

अंतिम सामना पाहण्यासाठी त्या स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. शेवटच्या चेंडूवर पुण्याला विजयासाठी ४ धावांची गरज होती. त्यावेळी मुंबईचे सर्व चाहते आपलाच संघ जिंकावा म्हणून प्रार्थना करत होते. या आजींनीही देवाचा धावा करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांची प्रार्थना करतानाची छबी कॅमेऱ्याने टिपली. 

या आजींची प्रार्थना देवाने ऐकली आणि मुंबईचा एका धावेने विजय झाला. त्यामुळे सामन्यानंतर या आजींची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली.