ऋषभ पंतच्या वडिलांचे निधन, टीम सोडून परतला घरी

 भारतीय टीमचा युवा खेळाडू आणि आयपीएल-१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणाऱ्या ऋषभ पंत याचे वडील राजेंद्र पंत यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. 

Updated: Apr 7, 2017, 05:13 PM IST
ऋषभ पंतच्या वडिलांचे निधन, टीम सोडून परतला घरी title=

नवी दिल्ली :  भारतीय टीमचा युवा खेळाडू आणि आयपीएल-१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणाऱ्या ऋषभ पंत याचे वडील राजेंद्र पंत यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. 

वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच ऋषभ पंत टीम सोडून तात्काळ घरी गेला आहे. काल रात्री नऊ वाजता जेवणासाठी ऋषभची आई वडिलांना उठविण्यास गेली तेव्हा ते अंथरूणातून उठलेच नाही. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. 

निधनाची बातमी ऋषभला कळविण्यात आली त्यानंतर त्यानंतर टीम मॅनेजमेंटला सांगू तो घरी परतला. गुरूवारी त्यांच्या वडिलांवर हरिद्वार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पहिला सामना उद्या ८ एप्रिल रोजी होणार आहे. या सामन्यात ऋषभ खेळतो का हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, या सिझनमध्ये रणजी सामन्यात ऋषभचे शानदार कामगिरी होती. त्यामुळे आयपीएलमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा होती. पण वडिलांच्या निधनाने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 

उत्तराखंडमधील रुडकी येथे ऋषभ पंत याचे मूळ गाव आहे. विकेटकीपर फलंदाज धोनीला ऋषभ आपला आदर्श मानतो.