नशीब चांगलं की आम्ही सामना जिंकलो - स्मिथ

आयपीएलच्या दहाव्या हंगामात गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात अखेरच्या षटकात पुण्याने बाजी मारली. 

Updated: Apr 7, 2017, 03:58 PM IST
नशीब चांगलं की आम्ही सामना जिंकलो - स्मिथ title=

पुणे : आयपीएलच्या दहाव्या हंगामात गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात अखेरच्या षटकात पुण्याने बाजी मारली. 

या सामन्यात अखेरच्या षटकात दोन षटकार लगावत पुण्याचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने संघाला विजय मिळवून दिला. 

या विजयानंतर स्मिथ म्हणाला, पुण्यात फलंदाजी करताना मजा येते. आमचं नशीब चांगलं की आम्ही शेवटच्या क्षणी सामना जिंकलो. भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातही स्मिथने शानदार खेळ केला होता. 

स्मिथ पुढे म्हणाला, फॉर्म हा फॉर्म असतो. जेव्हा तुम्ही लयात असता तेव्हा तुम्हाला त्या संधीचा फायदा घेऊ शकता.