नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार मोहमद्द अझरुद्दीन आणि त्यांची मैत्रीण शेनन यांचे जवळचे संबंध आता नात्यात बदलले आहेत. मोहम्मद अझरुद्दीन शनिवारी त्यांचा ड्रायव्हर जान मोहम्मद यांच्या कुटुंबांचे सात्वंन कऱण्यास गेले होते. मोहम्मद यांच्या ड्रायव्हरचे सप्टेंबरमध्ये निधन झाले होते. यावेळी अझरुद्दीन यांच्यासह शेननही उपस्थित होती. अझरुद्दीन यांच्यासह शेननला पाहून लोकांमध्ये चर्चा सुरु झाली.
यावेळी अझरुद्दीन यांनी शेनन आपली पत्नी असल्याची ओळख करुन दिल्याचे तेथे उपस्थित लोक आणि जान मोहम्मदचे कुटुंबिय सांगतात. शेननही मूळची अमेरिकेची असून ती सध्या दिल्लीत राहतेय.
अझरुद्दीन यांचा पहिला विवाह हैदराबादच्या नैरीनशी झाला होता. त्यानंतर त्यांच्या जीवनात सिने अभिनेत्री संगीता बिजलानी आली आणि १९९६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. २०१० मध्ये अझरुद्दीन यांचे नाव बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाशी जोडण्यात आले. २०१३ मध्ये अझरुद्दीनचा फोटो शेनन यांच्यासह पॅरिसमध्ये सुट्टी घालवत असल्याचा फोटो लीक झाला. मात्र त्यावेळी शेनने अझरुद्दीन आणि आपण केवळ चांगले मित्र असल्याचे सांगितले होते.