दुसऱ्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने 246 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Updated: Nov 21, 2016, 12:39 PM IST
दुसऱ्या कसोटीत भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय title=

विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने तब्बल 246 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय. आर. अश्विन आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी तीन गडी मिळवत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विजयासाठी 405 धावांचे आव्हान असलेल्या इंग्लंड संघाची पाचव्या दिवशी चांगली सुरुवात झाली नाही. चौथ्या दिवशी इंग्लंडने 87 धावांत केवळ दोन गडी गमावले होते. मात्र लंचपर्यंत इंग्लंडची अवस्था सात बाद 142 इतकी झाली होती.

लंचनतर मात्र भारताने इंग्लंडला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. जयंत यादवने दोन तर अश्विनने एक बळी मिळत भारताला विजय मिळवून दिला. या विजयासोबतच भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये.