'सोनम गुप्ता बेवफा है' ची चर्चा क्रिकेटच्या मैदानावर

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेली सोनम गुप्ताची चर्चा क्रिकेटच्या मैदानावर पोहचलीये. सोनम गुप्ता बेवफा है हा प्रश्न अनेक क्रिकेटर्सना विचारण्यात आला.

Updated: Nov 21, 2016, 10:03 AM IST
'सोनम गुप्ता बेवफा है' ची चर्चा क्रिकेटच्या मैदानावर title=

विशाखापट्टणम : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेली सोनम गुप्ताची चर्चा क्रिकेटच्या मैदानावर पोहचलीये. सोनम गुप्ता बेवफा है हा प्रश्न अनेक क्रिकेटर्सना विचारण्यात आला.

विशाखापट्टणम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीदरम्यान कॉमेंट्री बॉक्समधील वातावरण खेळीमेळीचे होते. यावेळी आकाश चोप्रा यांनी कॉमेंट्री बॉक्समधील अनेकांना सोनम गुप्ताबद्दल प्रश्न विचारला. 

डीन जोन्स यांना विचारले असता ते म्हणाले, मला याबाबत काही माहीत नाही. मी फक्त क्रिकेट जाणतो. त्यानंतर किरण मोरेंना विचारला तर ते म्हणाले, मला नाही माहीत सोनम गुप्ता कोण आहे?

यानंतर व्ही.व्ही एस लक्ष्मणलाही विचारले तेव्हा तो म्हणाला, मला नक्की खात्री आहे की सोनम गुप्ता बेवफा आहे कारण हे आकाश सांगतो आणि आकाश नेहमी खर तेच सांगतो. त्यामुळे सोनम गुप्ता बेवफा है. त्यानंतर कपिल देवलाही हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा कपिल म्हणाले, मला नाही वाटत सोनम गुप्ता बेवफा आहे.