वनडे सराव सामन्यातही भारताची बाजी

ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या टीम इंडियानं वन-डे आणि टी-२० सीरिज सुरु होण्यापूर्वी पहिल्या दोन्ही प्रॅक्टीस मॅचमध्ये विजय मिळवलाय.  

Updated: Jan 10, 2016, 08:51 AM IST
वनडे सराव सामन्यातही भारताची बाजी title=

पर्थ : ऑस्ट्रेलिया दौ-यावर गेलेल्या टीम इंडियानं वन-डे आणि टी-२० सीरिज सुरु होण्यापूर्वी पहिल्या दोन्ही प्रॅक्टीस मॅचमध्ये विजय मिळवलाय.  

 

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्धची दुसरी प्रॅक्टीस मॅच टीम इंडियानं ६४ रन्सनं जिंकलीय. टीम इंडियानं ५० ओव्हर्समध्ये २४९ रन्स केले तर ऑस्ट्रेलिया इल्हेवनची संपूर्ण टीम केवळ १८५ रन्सच करु शकली. 

 

टीम इंडियाकडून बॅट्समन आणि बॉलर्सनंही चांगली कामगिरी केली. आता १२ तारखेला होणा-या पहिल्या वनडे कडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलय.