दुखापतीमुळे मोहम्मद शामी टीम इंडियामधून बाहेर

दुखापतीतून नुकताच परतलेला भारताचा गोलंदाज मोहम्मद शामी पुन्हा एकदा संघाबाहेर गेलाय. 

Updated: Jan 9, 2016, 06:00 PM IST
दुखापतीमुळे मोहम्मद शामी टीम इंडियामधून बाहेर title=

नवी दिल्ली : दुखापतीतून नुकताच परतलेला भारताचा गोलंदाज मोहम्मद शामी पुन्हा एकदा संघाबाहेर गेलाय. मांसपेशीच्या दुखापतीमुळे १२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आलीय. 

बीसीसआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. शामीच्या डाव्या पायाला दुखापत झालीय. ज्यामुळे चार ते सहा आठवडे त्याला विश्रांती घेण्याची गरज आहे. यामुळेच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयच्या मेडिकल टीमने सांगितलेय. शामीच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आलीय. 

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सराव सामन्यादरम्यान शामी दुखापतग्रस्त झाला. याआधी दुखापतीमुळे गेली नऊ महिने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्याने संघात पुनरागमन केले होते. मात्र आता पुन्हा एकदा तो दुखापतीमुळे संघाबाहेर राहणार आहे.