वर्ल्डकप : भारताची दक्षिण आफ्रिकेशी टक्कर, सामन्याकडे लक्ष

आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या  भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. हा सामना थोड्याच वेळात येथे होणार आहे.

Updated: Feb 22, 2015, 08:12 AM IST
वर्ल्डकप : भारताची दक्षिण आफ्रिकेशी टक्कर, सामन्याकडे लक्ष title=

मेलबर्न : आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या  भारताची गाठ पडणार आहे ती बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. भारताने आफ्रिकेबरोबर एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आज टीम इंडियाची कसोटी असणार आहे. हा सामना थोड्याच वेळात येथे होणार आहे.
  
मिसबाहच्या पाकिस्तानच्या तुलनेत डिव्हिलियर्सच्या दक्षिण आफ्रिकेची ताकद अफाट आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकताना कसोटी लागणार आहे. मात्र, पाकिस्तानला मोठ्या फरकाने हरविल्याने भारताचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यातच रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना यांना सापडलेला सूर यामुळे टीम इंडियाची बॅटींग लाईन चांगली आहे.
 
पाकिस्तानला विश्वचषकामध्ये आपण प्रत्येक वेळेला पराभूत केलं आहे, तर विश्वचषकामध्ये भारताला दक्षिण आफ्रिकेकडून तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. हा सामना दक्षिण आफ्रिका जिंकण्याची शक्यता आहे, कारण त्यांची टीम फारच स्ट्राँग आहे. 

आजवरच्या तिन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. १९९२ साली अॅडलेड ओव्हलवर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला होता. त्यानंतर १९९९ साली होवच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर चार विकेट्स राखून मात केली. २०११  साली नागपूरच्या मैदानात सचिननं शतक ठोकलं, पण सामना दक्षिण आफ्रिकेनं तीन विकेट्स राखून जिंकला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.