दमदार खेळी करणाऱ्या केदारचे कोहलीकडून कौतुक

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कोहलीने संघाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका चांगली राहिली तसेच केदार जाधव भारतीय क्रिकेटमधील नवा शोध आहे असेही कोहली म्हणाला.

Updated: Jan 23, 2017, 09:59 AM IST
दमदार खेळी करणाऱ्या केदारचे कोहलीकडून कौतुक title=

कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कोहलीने संघाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका चांगली राहिली तसेच केदार जाधव भारतीय क्रिकेटमधील नवा शोध आहे असेही कोहली म्हणाला.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ५ धावांनी पराभव झाला. मात्र केदार जाधवच्या ९० धावांच्या खेळीने क्रिकेट चाहत्यांचे पुरेपूर मनोरंजन झाले. सामन्यानंतर कोहली म्हणाला, आम्ही १७३ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी दोन युवा क्रिकेटपटूंनी जबाबदारीने खेळ करताना विजयाच्या जवळ नेले. 

जाधवने चांगली खेळी केली. गेल्यावर्षी त्याला जास्त सामने खेळता आले नाही मात्र आता त्याने लय मिळवली आहे. यामुळे धोनी आणि युवराजला वरच्या क्रमांकावर येऊन खेळण्याचे स्वातंत्र्य मिळते, असेही पुढे कोहली म्हणाला.