लंडन : सीरिजमध्ये 1-1ने बरोबरीत असलेली भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथ्या टेस्टला आजपासून ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. मात्र, टीममध्ये धक्कादायक बदलाची शक्यता आहे. त्यामुळे कोण बाहेर बसणार आणि कोण आत येणार याची उत्सुकता आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा आघाडी घेण्यास उत्सुक असेल. तर इंग्लिश टीम सलग दुस-या विजयाची नोंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसेल. ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार यांच्या दुखापतीमुळे भारताची बॉलिंग उघडी पडली आहे. त्यामुळे आर. अश्विनला टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय गौतम गंभीरचाही समावेश होऊ शकतो.
भारताला विजय हवा असल्यास विराट कोहली, पुजारा या बॅट्समन्सनाही आपला खेळ उंचवावा लागेल. तर दुसरीकडे इंग्लिश टीम स्टुअर्ट ब्रॉडच्या दुखापतीमुळे चिंताग्रस्त आहे. ऍलिस्टर कूकसह सर्व प्रमुख बॅट्समन फॉर्मात आल्याने भारतासमोर आव्हान असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.