15 कसोटी सामन्यांनंतर परदेशात जिंकण्याची संधी

लॉर्डसमधल्या ढगाळ वातावरणात यजमान इंग्लंडवर पराभवाचे ढग जमा झालेत. सांघिक प्रयत्नांच्या जोरावर परदेशात तीन वर्षांनी टीम इंडियाच्या विजयाची 'मुरली' वाजण्याची संधी आहे. 

Updated: Jul 21, 2014, 12:52 PM IST
15 कसोटी सामन्यांनंतर परदेशात जिंकण्याची संधी title=

लंडन : लॉर्डसमधल्या ढगाळ वातावरणात यजमान इंग्लंडवर पराभवाचे ढग जमा झालेत. सांघिक प्रयत्नांच्या जोरावर परदेशात तीन वर्षांनी टीम इंडियाच्या विजयाची 'मुरली' वाजण्याची संधी आहे. 

मुरली विजय, रवींद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमारच्या हाफ सेंच्युरीमुळे टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 319 रन्सचे टार्गेट ठेवलंय. या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा कोसळली. 

चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 4 आऊट 105 रन्स केलेत. टीम इंडिया ऐतिहासिक विजयापालून 6 विकेट्स दूर आहे. 3 वर्ष आणि 15 टेस्टनंतर परदेशात टेस्ट जिंकण्याची संधी धोनी ब्रिगेडला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.