नवी दिल्ली : कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघांमधली नियोजित क्रिकेट मालिका श्रीलंकेत खेळवण्यास दोन्ही देशांच्या सरकारांनी परवानगी दिली आहे. येत्या १५ डिसेंबरपासून श्रीलंकेत ही मालिका खेळवण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
या मालिकेत तीन वन डे आणि दोन ट्वेण्टी ट्वेण्टी सामन्यांचा समावेश आहे. बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात भारत आणि पाकिस्तानात पुन्हा क्रिकेट खेळवण्यासाठी करार झाला होता.
त्यानुसार दोन कसोटी, पाच वन डे आणि दोन ट्वेण्टी ट्वेण्टी सामन्यांच्या मालिकेचं पहिलं यजमानपद पाकिस्तानला मिळालं होतं. सदर मालिकेत यूएईत खेळवण्यात येणार होती. पण भारताचा यूएईत खेळण्यास आणि पाकिस्तानचा पुन्हा भारतात खेळण्यास विरोध होता.
भारत पाकिस्तान दरम्यानची मालिका श्रीलंकेत खेळवण्याचा पर्याय दोन्ही बाजूंना मान्य झाला. आणि आता त्या मालिकेवर सरकारी मान्यतेचीही मोहोर उमटली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.