अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला हवाय एक विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यात विजय मिळवणारी टीम इंडिया रविवारीही जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताने आजचा सामना जिंकल्यास टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवू शकेल. 

Updated: Jan 31, 2016, 11:38 AM IST
अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला हवाय एक विजय title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यात विजय मिळवणारी टीम इंडिया रविवारीही जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारताने आजचा सामना जिंकल्यास टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवू शकेल. 

सध्या भारत ११७ गुणांसह रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. भारताने तिसराही सामना जिंकल्यास १२० गुणांसह भारत पहिल्या स्थानावर जाईल. मात्र ऑस्ट्रेलिया ११२ गुणांवरुन ११० गुणांवर घसरेल. 

भारत सध्या तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया आठव्या स्थानी आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या रँकिंगमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहे. 

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने यापूर्वीच दोन सामने जिंकल्याने व्हाईटवॉश टाळण्याचा ऑस्ट्रेलिया पुरेपूर प्रयत्न करेल.