टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत प्रबळ दावेदार - गावस्कर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० मध्ये दमदार विजयानंतर भारताचे पूर्व कर्णधार सुनील गावस्कर यांनी 'महेंद्रसिंग धोनीची टीम ही टी-२० वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार असल्याचं' म्हटलं आहे. 

Updated: Jan 27, 2016, 10:54 PM IST
टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत प्रबळ दावेदार - गावस्कर title=

नवी दिल्ली : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० मध्ये दमदार विजयानंतर भारताचे पूर्व कर्णधार सुनील गावस्कर यांनी 'महेंद्रसिंग धोनीची टीम ही टी-२० वर्ल्ड कपसाठी प्रबळ दावेदार असल्याचं' म्हटलं आहे. 

भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३७ रनने हरवलं. त्यानंतर श्रीलंकेचे पूर्व क्रिकेटर रसेल अर्नोल्ड यांनी ट्विट करुन म्हटलं की भारत हा विश्व टी-२० चा सगळ्यात मजबूत दावेदार दिसतोयय त्यावर सुनील गावस्कर यांनी त्यांचं समर्थन केलं. 

गावस्कर यांनी म्हटलं की 'भारतीय टीम ज्या प्रकारे खेळतेय ती स्थिती चांगली आहे. भारताचे बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजानीही चांगली लाईन आणि लेंथ मिळवली आहे. जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांचं टीममध्ये निवड झाल्याने टीम आणखी मजबूत झाली आहे.'