सौरव गांगुलीची 'मास्टर चॅम्पियन लीग'मधून माघार

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 'मास्टर चॅम्पियन लीग' मधून माघार घेतली आहे. सराव दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने लिगमधून माघार घेतली आहे. 

Updated: Jan 27, 2016, 10:31 PM IST
सौरव गांगुलीची 'मास्टर चॅम्पियन लीग'मधून माघार title=

दुबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 'मास्टर चॅम्पियन लीग' मधून माघार घेतली आहे. सराव दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने लिगमधून माघार घेतली आहे. 

गांगुली हा लिब्रा लेजेंड टीमचा कर्णधार होता. जगातील सर्व निवृत्त झालेले खेळाडूंचा या लीग मध्ये समावेश आहे.

सराव दरम्यान दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे गांगुलीने या लीग मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुबईमध्ये होणाऱ्या या लीगसाठी गांगुली मात्र त्याच्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. दुबईत पत्रकार परिषद घेऊन त्याने ही घोषणा केली आहे.