मोहाली : मोहाली टेस्टवर टीम इंडियानं आपली पकड मजबूत केली आहे. रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विनच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं टेस्टवर वर्चस्व गाजवलं. रविंद्र जाडेजाच्या 90 आर. अश्विनच्या 72 आणि जयंत यादवच्या 55 रन्समुळे टीम इंडियाला पहिल्या इनिंगमध्ये 417 रन्सपर्यंत मजल मारण्यात यश आलं.
यानंतर दुस-या इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. इंग्लिश टीमचे 4 बॅट्समन 78 रन्सवरच ऑल आऊट झाले. बॅटिंगनंतर अश्विननं आपल्या स्पिन बॉलिंगनं इंग्लिश टीमला चांगलाच धक्का दिला.
ऍलिस्टर कूक, मोईन अली आणि बेन स्टोक्सला त्यानं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इंग्लडची टीम अजूनही 56 रन्सनं भारताच्या पिछाडीवर आहे. आता इनिंगनं पराभव टाळण्याचं आव्हान कूक आणि कंपनीसमोर आहे.