'टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकप जिंकणार'

टीम इंडियात पुन्हा एकदा जगज्जेते होण्याची क्षमता या संघात आहे',  असे मत भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले. चार वर्षांपूर्वी विश्‍वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघास कर्स्टन यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

Updated: Feb 18, 2015, 12:03 AM IST
'टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकप जिंकणार' title=

नवी दिल्ली : टीम इंडियात पुन्हा एकदा जगज्जेते होण्याची क्षमता या संघात आहे',  असे मत भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले. चार वर्षांपूर्वी विश्‍वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघास कर्स्टन यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

'विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी झालेल्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघ जगज्जेतेपद राखू शकणार नाही, असेच मत तयार होत असतांना कर्स्टन यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.

'भारतीय संघ नक्कीच करंडक राखू शकतो. सगळेच जण भारताला कमी लेखत आहेत. पण बाद फेरीमध्ये कसे खेळायचे, हे भारतीय संघाला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या स्पर्धेत त्यांनी कमालीची कामगिरी केली होती. त्यातून संघाला प्रेरणा मिळू शकते. त्यांची फलंदाजीही दर्जेदार आहे. 

विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी यांनी विश्‍वकरंडक जिंकला आहे. त्यांच्या जोडीला काही चांगले तरुण खेळाडूही आहेत. त्यामुळे त्यांना इतक्‍यात मोडीत काढू नका, असं कर्स्टन यांनी म्हटलं आहे.

भारतीय संघामध्ये गोलंदाजी हा कच्चा दुवा आहे. ईशांत शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. भुवनेश्‍वर कुमारच्या तंदुरुस्तीवरही प्रश्‍नचिन्ह आहे. आश्‍विनचा अपवाद वगळता इतर गोलंदाजांनाही फार अनुभव नाही. याविषयी कर्स्टन म्हणाले, "प्रत्येक संघामध्ये काही ना काही कच्चा दुवा असतो. प्रतिस्पर्धी त्याचाच फायदा घेत असतात. 

२०१३ मधील चॅम्पियन्स करंडक स्पर्धा या संघाने जिंकली. त्यांनी पूर्ण नवा संघ उभा केला आणि आता बहुतांश तरुण खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. "यंदाच्या स्पर्धेत विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि भारत असतील, असे मतही कर्स्टन यांनी व्यक्त केले.

२०११ मधील स्पर्धेतही काही सामन्यांत भारताची फलंदाजी किंवा गोलंदाजी चांगली झाली नव्हती. पण तरीही एकत्रित प्रयत्नांनी आम्ही सामने जिंकत गेलो. कमकुवत बाजूमुळे होणारे नुकसान कसे हाताळता येते, यावर कामगिरी अवलंबून असते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.