आयसीसी क्रमवारीत भारताचं प्रथम स्थान आणखी मजबूत

आयसीसी क्रमवारीत भारताचं प्रथम स्थान आणखी मजबूत झालं आहे. भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत मिळवलेलं यश यामुळे हे शक्य झालं आहे.

Updated: Nov 17, 2014, 10:21 PM IST
आयसीसी क्रमवारीत भारताचं प्रथम स्थान आणखी मजबूत title=

मुंबई: आयसीसी क्रमवारीत भारताचं प्रथम स्थान आणखी मजबूत झालं आहे. भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत मिळवलेलं यश यामुळे हे शक्य झालं आहे.
 
टीम इंडियानं या मालिकेत ५-० असं जोरदार यश संपादन केलं. त्यामुळं भारताच्या खात्यात आता ११७ गुण जमा झाले आहेत. या मालिकेआधी भारत ११३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर होता. टीम इंडियानं तिसऱ्या स्थानावरून आता नंबर वनवर झेप घेतली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये सध्य़ा वन डे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला असून, उरलेले तिन्ही सामने जिंकणारा संघ आयसीसीच्या वन डे क्रमवारीत अव्वल स्थान गाठू शकतो.
 
दक्षिण आफ्रिकेचा संघ ११५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया ११४ गुणांसह तिसऱ्या आणि श्रीलंका १०८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.