नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सासरे-जावई सुटले आहेत, मात्र राज कुंद्रा यांच्यावर फिक्सिंगमध्ये सामिल असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आयसीसीचे चेअरमन एन श्रीनिवासन यांना आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी मुदगल समितीने क्लिन चीट दिली आहे. मुदगल समितीने ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
एन श्रीनिवासन यांचे जावई मय्यपन यांच्या विरोधातही स्पॉट फिक्सिंगचे सबळ पुरावे नसल्याचं समितीने म्हटलं आहे. गुरूनाथ मय्यपन हा चेन्नई टीमचा प्रमुख आहे. मात्र अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याच्यावर स्पॉट फिक्सिंगमध्ये सामिल असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आयपीएल प्रमुख सुंदर रमन देखिल बुकिंच्या संपर्कात असल्याचं समितीने म्हटलं आहे, सुंदर रमनने बुकिंना आठ फोन केल्याची माहिती समितीने दिली आहे.
राज कुंद्रा हे बेटिंग करत होते, ते बुकिंच्या संपर्कात होते, असं अहवाल नमुद करण्यात आलं आहे. राज कुंद्रा हे राजस्थान रॉयल्सच्या टीमचे मालक आहेत. स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले तेव्हा एन श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.